आज कोरोना नावाच्या वैश्विक महामारीने गेल्या १० महिन्यापासून संपूर्ण जगाला एका बंदिशाळेचे स्वरूप आले आहे . बौध्दिक सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण सृष्टीवर अधिराज्य गाजविण्याचे स्वप्न रंजन करणारा मनुष्य एका सूक्ष्म जीवामुळे किं कर्तव्यमूढता या आवस्थेला पोहोचला आहे. आज जगभरात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे . काही देशां मधे तर या महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशाबाबत समाधानाची बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे परंतु या महामारीच्या बाबतीत धक्कादायक गोष्ट अशी की अशा विकारापासून बरे झालेले रुग्ण श्वसनाचे विकार ,हदयरोग ,दौर्बल्य अशा समस्यांनी पुन्हा रुणालयात भरती होताना दिसत आहेत. या लक्षणांना post covid complications असे म्हंटले जाते . ताज्या सर्वेक्षणानुसार १०% रुग्णांमधे अशा लक्षणांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या लक्षणांमधे Lung fibrosis, Pulmonary thrombo embolism ( PTE ) , दौर्बल्य (weakness ) बऱ्याच रुणांमधे हृदय अवयवासंदर्भात समस्या उदभवलेल्या आढळून आले आहे. या विकाराची उपद्रवांची व्याप्ती केवळ शरीरा .पुरती मर्यादीत नसून मानस विकार जसे एकाग्रता कमी होणे , एकलकोंडेपणा वाढणे , मृत्यूची सतत भिती त्यामुळे निद्रानाश इ तक्रारी निर्माण होताना दिसत आहेत . खरं तर कोरोना ही एक वैश्विक महामारी आहे हे खरे जरी असले तरी अशा परिस्थितीला धैर्यपूर्वक सामोरे जाणे अत्यंत आवश्यक असतं . काळजी करण्यापेक्षा काळजी घेतली तर निश्चितच आपण या परिस्थितीला यशस्वी रित्या तोंड देऊ शकतो. English मधे असे म्हंटले जाते
A negative mind will never give you a pasitive life. नकारात्मक मानसिकतेचा विपरीत परिणाम प्रतिकर क्षमतेवर होतो व त्याचा परिपाक म्हणजे व्याधी बळावतो किंवा उपद्रव स्वरूपात दीर्घकाळ त्रास देतो.
खरंतर अशा परिस्थितीमधे आयुर्वेद शास्त्र हे निश्चित प्रभावी ठरू शकते असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते कारण आयुर्वेद शास्त्राचा उद्देश केवळ रोग बरा करणे नसून तो पुन्हा उत्पन्न घेऊ नये या साठी प्रयत्न करणे हा आहे . रोगकारणां चा शोध घेऊन तो समूळ नाश करून शरीराला प्रतिकार क्षम बनविणे हा आहे. व हेच आयुर्वेदाचे बल स्थान आहे. मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की चक्रपाणि आयुर्वेद चिकित्सालय नासिक या ठिकाणी अशा post covid symptoms असलेल्या रुग्णांनी उपचारांच्या माध्यमातून रोगमुक्त होण्याचा अनुभव घेतला आहे. चक्रपाणि चिकित्सालयात उपचारांबरोबरच आयुर्वेदीय जीवन शैली संदर्भात मार्गदर्शन केले जाते . शेवटी मी एवढं च सांगेन की बरं वाटणं या पेक्षा बरं होणं व बरं रहाणं हे महत्वाचे आहे हे कृण्वन्तो विश्वं स्वस्थं या उदात्त हेतु पूर्ती साठी आवश्यक आहे हे निश्चित
वैघ मयुर कुलकर्णी एमडी ( आयुर्वेद)9422828330